करोना महामारी गरिबांच्या, त्यातही महिलांच्या पिळवणुकीत दिवसेंदिवस अधिकाधिक भर टाकत आहे...
भारताचा विचार केला तर या महामारीची सर्वाधिक किंमत ही स्थलांतरित मजूरच चुकवत आहेत. त्यातही स्थलांतरित मजूर महिलांचा विचार केला, तर सर्वच स्तरावर त्यांच्यासाठी हा संघर्ष दुप्पट असणार आहे. आर्थिक, सामाजिक समानतेसाठी त्यांनी आजवर केलेल्या संघर्षाला पुन्हा एकदा मागे घेऊन जाण्यास ही करोना महामारीच केवळ जबाबदार नाही, तर राजकीय, सामाजिक, आर्थिक स्तरावरील त्यांच्याप्रती असणारी उदासीनतादेखील तितकीच जबाबदार आहे.......